कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षीय महिलेच्या पोटातील ३ किलो वजनाची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. साके (ता. कागल) येथील सौ. शांताबाई खराडे (वय ४५) यांना मागील २ वर्षापासून पोटदुखीची तक्रार होती. त्यांना सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. स्त्री रोग विभागातील डॉ. गजाजन देव व डॉ. जितेंद्रसिंग रजपूत यांनी तपासणी केली असता महिलेच्या पोटामध्ये गाठ असल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीनंतर गर्भाशयाच्या पिशवीच्या शेजारी १८/१७ से.मी. आकाराची ३ किलो वजनाची गाठ आढळून आली. त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यतं गुंतागुंतीच्या ही शस्त्रक्रिया अडीच तास सुरु होती. शस्त्रक्रियेनंतर पेशंटची प्रकृती स्थिर आहे.
या शस्त्रक्रियेमध्ये प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. गजानन दैव, डॉ. जितेंद्रसिंग रजपूत, भूलतज्ज्ञ डॉ. खलील मुल्ला, डॉ. विश्वास भोसले तसेच उत्तम पाटील व त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य मिळाले.
Siddhagiri Hospital on Social Channels
.............................................
www.facebook.com/siddhagirihospital
https://www.instagram.com/siddhagirihospital
www.youtube.com/channel/UCHrvSJzekiROpnkbmtsdddw
.............................................
Like , Follow & Subscribe us
No comments:
Post a Comment