Showing posts with label siddhagiri hospital. Show all posts
Showing posts with label siddhagiri hospital. Show all posts

Tuesday, 4 July 2023

मान-सन्मान 

अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

राजा असो की प्रजा, गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जगात वावरताना प्रत्येकाला वाटते, की आपला सन्मान व्हावा, मान मिळावा. यात काहीच गैर नाही; पण सत्काराचे, कौतुकाचे हार स्वीकारताना आपली समाजाप्रती काही कर्तव्ये असतात. सुजाण नागरिक म्हणून काही जबाबदारी असते. या जगात मान दिला, तर सन्मान नक्की मिळतो. अहंकार, मीपणा बाजूला ठेवून एकमेकांचा सन्मान केला, तर आपण सारेच सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू शकतो.

'जगा आणि जगू द्या'या तत्त्वाप्रमाणे, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवा, माणसांचा आदर करा' हे साधे सूत्र पाळल्यास कुणी आपल्याकडे बोट दाखविणार नाहीत. मुळात आपल्याला कुणी वाईट म्हणू नये, असे वर्तन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. इतरांना मान दिला म्हणून आपला मान कमी होतो, किंवा पैसे जातात, आर्थिक नुकसान होते असे काही आहे का? मग एकमेकांचा सन्मान करायला आपण कमी का पडायचे? आत्मसन्मान हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. सन्मानाने जगताना दुसऱ्यांच्या भावना दुखावण्यात वेळ घालवू नये. परस्परांमध्ये द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैर, कपट हे सारे विसरण्याची गरज आहे.

जगज्जेता सिकंदरने पराभूत झालेल्या राजा पोरसला विचारले, 'तुमची इच्छा काय आहे?' त्यावर तो म्हणाला, 'मला राजाप्रमाणे वागव.' हे ऐकून सिकंदर जिंकलेले राज्य परत त्याला परत देऊन गेला. यात आत्मसन्मान आणि दुसऱ्याप्रती सन्मान या दोन्हींचे दर्शन घडते. सन्मानाने जगण्यासाठी काय लागते? अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला की झाले. जादा हव्यासापोटी अनेकदा काही जण लाचार होतात. जीवनात इज्जत मोलाची. ती एकदा गेली, की परत मिळत नाही आणि जगाच्या बाजारात विकतही मिळत नाही. अनेकदा घरातील व्यक्तींना मोठे म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही. खिशात चार पैसे आल्यावर अनेकांची चाल बदलते. हल्ली श्रीमंती पाहून मान देण्याची प्रथा आहे; पण त्यापेक्षा ज्ञानी, समाजसुधारक, साधू, संतांना अधिक मान मिळायला हवा. एकमेकांचा सन्मान केल्यास मैत्री नुसती टिकत नाही, तर बहरते. कोणत्याही नात्यात हे सूत्र लागू पडते. एकमेकांच्या धर्माचा, भावनांचा, मतांचा, संस्कृतीचा सन्मान व्हावा. दुसऱ्यांचा आदर करण्याची, सन्मान ठेवण्याची सुरुवात घरात करावी. 'सन्मान द्या आणि मान घ्या' या तत्त्वानुसार वागल्यास कुणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही.


OPTHO CAMP PROMOTION

#दृष्टी असेल तर सृष्टी दिसेल 
#मोफत मोतीबिंदू शत्रक्रिया शिबीर 


 बालसंस्कार




घरात बाळ जन्माला आलं, की सर्वांनाच आनंद होतो; पण त्यानंतर जन्मदात्यांची जबाबदारी वाढते. त्याला सुशिक्षित, सुसंस्कारित करण्यासाठी आणि पुढं त्यानं परिवाराचा नावलौकिक वाढवावा यासाठीच ही धडपड असते. बाळाला जन्म देत मातृपितृ ऋणातून मुक्त झाल्याचा आनंद एकीकडे आणि बाळाला सुसंस्कारी करण्याची जबाबदारी दुसरीकडे, अशा दुहेरी भूमिकेत ते असतात. बाळावर संस्कार करण्याचा क्रम ठरलेला असतो. जन्मापासून पाच वर्षांपर्यंत प्रेमानं पालन-पोषण करणं आवश्यक असतं. या काळात त्याला पाप-पुण्य, सहकार-असहकार, राग-द्वेष, चांगलं-वाईट यांतील काहीही कळत नसतं. पाहायला आणि ऐकायला असणाऱ्या अप्रिय गोष्टी बाळासमोर करू नये. बाळाला रागवणं आणि लाड करण्याची वेळ ठरलेली आहे. पाच वर्षं लाडात, प्रेमात वाढवणं, त्याला प्रेमाची असलेली अपेक्षा पूर्ण करणं महत्त्वाचं.

वयाच्या पाच ते पंधरा वर्षांपर्यंत प्रेमाबरोबर अनुशासन महत्त्वाचं आहे. सहाव्या वर्षापासून प्रेमाबरोबर थोडं कडकपणे वागवावं. नियोजन, शिस्त आणि संयमाचा उत्तम पाठ आहे. नात्याबरोबरच समाजातील चांगलं-वाईट, ज्ञान-अज्ञान, फायदा-तोटा, धर्म-अधर्म, कर्तव्य, जबाबदारी, जग, निसर्ग, परिवार, समाज यांच्याशी नातं या सर्वांची या वयात ओळख करून द्यावी. शाळेत जे मिळणार नाही, ते पालकांकडून मिळत असतं. ते देण्याची जबाबदारी त्यांची आहे. निसर्ग नावाच्या विद्यापीठात बऱ्याच विद्या असतात. प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार शिकवावा लागतो. सोळाव्या वर्षानंतर त्याला मित्रासारखं वागवावं. मित्राप्रमाणे सल्ला द्यावा. संस्कारांच्या मुशीत तयार करावं. अनेकदा त्याला हित-अहित माहीत नसतं; त्यामुळे त्याला विश्वासानं, श्रद्धेनं माहीत करून द्यावं. तो वाईट संगतीला लागू नये, वाया जावू नये याची काळजी घेणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे, यासाठी जे जे आदर्श आहे, ते ते त्याच्या समोर ठेवावं. बाळ ही पारिवाराची संपत्ती आहे, परिवाराचा बोजा होऊ नये, एवढी काळजी घ्यायलाच हवी.




एका गुन्हेगारास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. त्याला जेलर शेवटची इच्छा विचारतो; तेव्हा आईला भेटण्याची इच्छा असल्याचं तो सांगतो. आई समोर आल्यानंतर, आजच्या स्थितीला तीच जबाबदार असल्याचा आरोप तो करतो. पहिल्या चोरीच्या वेळी तू अडवलं असतंस, तर भविष्यात मोठा गुन्हेगार झालो नसतो, असा ठपका तो तिच्यावर ठेवतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

MAY TIMELINE

#1 MAY 
    INTERNATIONAL WORKER'S DAY
    जागतिक कामगार दिवस 


#1 MAY 
    INTERNATIONAL WORKER'S DAY
    जागतिक कामगार दिवस 

#3 MAY 
   अक्षयतृतीया


#8 MAY 
   WORLD RED CROSS DAY 

#8 MAY 
   HAPPY MOTHER'S DAY
   जागतिक मातृ दिन 

#11 MAY 
   WORLD SCIENCE & TECHNOLOGY DAY 
   जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवस

#12 MAY 
   HAPPY NURSES DAY 
   जागतिक परिचारिका दिवस 


#21 MAY 
   WORLD ANTI TERRORISM DAY
   जागतिक दहशतवाद विरोधी दिवस


 

JUNE TIMELINE

#1 JUN
    WORLD MILK DAY 
    जागतिक दूध दिवस 

#3 JUN
    WORLD BICYCLE DAY
    जागतिक सायकल दिवस 


#5 JUN
    WORLD ENVIRONMENT DAY
    जागतिक पर्यावरण दिवस 


#8 JUN
    WORLD OCEAN DAY
    जागतिक महासागर दिवस 

#10 JUN
    WORLD EYE DONATION DAY
    जागतिक नेत्रदान दिवस 

#12 JUN
    WORLD DAY AGAINST CHILD LABOUR 
    जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 

#14 JUN
    WORLD BLOOD DONOR DAY
    जागतिक
 रक्तदाता दिवस 

#15 JUN
    NATURE PHOTOGRAPHY DAY
    
निसर्ग फोटोग्राफी दिवस 

#18 JUN
    RANI LAXMIBAI
    
राणी लक्ष्मीबाई

#19JUN
    HAPPY FATHER DAY 
    पितृदिनाच्या शुभेच्छा

#21 JUN
    INTERNATIONAL DAY OF YOGA 
    आंतरराष्ट्रीय योग दिवस 

#26 JUN
    CHHATRAPATI SHAHU MAHARAJ
    छत्रपती शाहू महाराज 


NEURO SECTION

#मेंदू आणि मणक्याचे सर्व उपचार 
   #डोकेदुखी, अपघात, ब्रेनट्युमर, चेहऱ्यावरील वेदना, मानेचे दुखणे, पॅरॅलिसिस, स्लिप डिस्क, फिट               (अकडी)

#मेंदू आणि मणक्याचे सर्व उपचार 
   #डोकेदुखी, अपघात, ब्रेनट्युमर, चेहऱ्यावरील वेदना, मानेचे दुखणे, पॅरॅलिसिस, स्लिप डिस्क, फिट               (अकडी)


#मेंदू आणि मणक्याचे सर्व उपचार 
   #डोकेदुखी, अपघात, ब्रेनट्युमर, चेहऱ्यावरील वेदना, मानेचे दुखणे, पॅरॅलिसिस, स्लिप डिस्क, फिट               (अकडी)


#IDENTIFY THE SYMPTOMS OF STROKE 
#BLURRED VISION

#IDENTIFY THE SYMPTOMS OF STROKE 
#FACE DROPPING ON ONE SIDE 

#IDENTIFY THE SYMPTOMS OF STROKE 
#BALANCE
   LOSS OF BALANCE, HEADACHE OR DIZZINESS

#IDENTIFY THE SYMPTOMS OF STROKE 
#ARM 
   ARM OR LEG WEAKNESS 


#IDENTIFY THE SYMPTOMS OF STROKE 
#SPEECH DIFFICULTY
   

#DID YOU KNOW? 
#CLIPPING OF ANEURYSM
#BRAIN ANEURYSM IS A LIFE THREATENING CONDITION THAT 
   REQUIRES URGENT  ATTENTION


#EPILEPSY 
#CAN BE CURED BUT IT NEEDS PROPER ATTENTIONAL & RIGHT                     DIAGNOSIS


#नको दुर्लक्ष पाठीच्या दुखण्याकडे 
#चालताना त्रास होत असेल...
#पाय सुन्न पडत असतील...
#कंबरेतून पायापर्यंत वेदना होत असतील तर...











 

सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेला स्टेट बँक ऑफ इंडिया चां हातभार

       गेल्या बारा वर्षापासून अखंड चालू असलेल्या  सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेच्या तपस्येला आज स्टेट बँक ऑफ इंडिया ने ॲम्बुलन्स प्रदान करून पाठबळ दिले. मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

      कणेरी सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील पहिले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देत असताना ॲम्बुलन्स हा घटक खूप महत्त्वाचा ठरत आला आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. अगदी दुर्गम भागात सुद्धा ही सेवा दिली जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने सिद्धगिरी मठाला ॲम्बुलन्स प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा कार्यक्रम आज सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये ५ वाजता संपन्न झाला. 

     यावेळी प.पु.अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजीनी तसेच  प्रख्यात निरो सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजकके यांनी सिद्धगिरी मठाच्या विविध उपक्रमांची तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. तसेच ॲम्बुलन्स प्रदान केल्याबद्दल sbi चे आभार मानले न्यूरोलोजिस्ट डॉ.प्रकाश भरमगौडर यांनी एस.बी.आय. च्या सर्व मान्यवरांशी संवाद साधला. SBIचे महाराष्ट्र जनरल मॅनेजर जोगेंद्र पाल सिंग यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल सारख्या नो प्रॉफिट नो लॉस या तत्त्वावर काम करणाऱ्या हॉस्पिटलला ॲम्बुलन्स प्रदान करताना आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धगिरी हॉस्पिटलचे एच.आर.श्री विवेक सिद्ध यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला SBI चे महाराष्ट्र जनरल मॅनेजर जोगेंद्र पाल सिंग, डेप्युटी जनरल मॅनेजर (ए.ओ कोल्हापूर) एम.एन.प्रसाद, रिजनल मॅनेजर विवेक कुमार सिन्हा यांच्यासोबत सिद्धगिरी हॉस्पिटल चा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.










ब्रेन बायपास सर्जरी- ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया केली यशस्वी. सिद्धगिरी हॉस्पिटल च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा.

 


  • डॉ. शिवशंकर मरजक्के
  • मेंदू शल्यचिकित्सक, सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी मठ

..................................................................................

      सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ लाख इतका खर्च सांगण्यात आला होता. अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के सर आणि त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले. 
         
         हा फुगवटा सामान्यतः ६ ते ७ मिमी एवढा असतो. आणि यामध्ये पेशंट च्या दगावण्याची ५०% शक्यता असते. पण या केसमध्ये हा फुगवटा १०.५ से.मी.एवढा मोठा होता.  रुग्णाच्या मेंदुपासून अक्कल दाढे पर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती. त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तप्रवाह सुरू झाला होता. हाताच्या शिरेचा तुकडा वापरून बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचेखालून मेंदूपर्यंत शिर जोडून मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला. त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली.  तब्बल ११ तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ. शिवशंकर मरजक्के सर यांनी रुग्णाचा जीव वाचवला. यामध्ये न्युरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगोंडर , हार्ट सर्जन डॉ. अमोल भोजे यांनी मोलाचे योगदान दिले. शक्यतो मेट्रो सिटी मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटल ची संख्या ७ ते ८ आहे. पण कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे. 

         येथे असणारी अत्तुच्य ऑपरेशन मशिनरी ज्याची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे. मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया, भुलतज्ञ स्पेशालिस्ट, न्युरो सर्जरी साठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ठ्यमुळे  सुमारे ४००, ते ५०० किलोमीटरवरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिध्दगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात. डॉ.शिवशंकर मरजक्के सर डबल गोल्ड मेडलिस्ट असून,१२ हजारपेक्षा ही जास्त शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या असून, मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियामध्ये त्यांचा हातखंडा आहे. भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार(epilepsy), इंडोस्कोपी अशा शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर आहेत. फक्त मेंदूच नाही तर हार्ट, कॅन्सर,किडनी, प्लास्टिक सर्जरी, डेंटल सर्जरी, स्त्री रोग यावर देखील येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. 

       श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,१२ वर्षापासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आले आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या १७ एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटलच्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटल च्या तुलनेत उजवा ठरत आहे. याचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी केले आहे 
..................................................................................................................................................

..................................................................................................................................................

..................................................................................................................................................

..................................................................................................................................................


..................................................................................................................................................

..................................................................................................................................................

आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड




त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...