Tuesday 19 April 2022

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी !

बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. चुकीचा आहार आणि कामाचा ताण यामुळे अनेकजण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्यप्रकारे ठेवताना दिसत नाहीत.

Wednesday 13 April 2022

गरजा अन् अपेक्षा ( सिद्धगिरी विचार )

 


अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

पशूपक्षीप्राणीवनस्पती या सर्वांपेक्षा देवाने मनुष्याला बहुतांशी जादा गोष्टी दिल्या. वाचा दिलीबुद्धी दिलीत्यामुळे सारे आनंदीसुखात राहतील अशी अपेक्षा होती.

पशूपक्षीप्राणीवनस्पती या सर्वांपेक्षा देवाने मनुष्याला बहुतांशी जादा गोष्टी दिल्या. वाचा दिलीबुद्धी दिलीत्यामुळे सारे आनंदीसुखात राहतील अशी अपेक्षा होती. तसे मात्र सर्वत्र दिसत नाही. माणूस स्वत:कडील गोष्टींचे मोल न जाणता इतरांशी तुलना करतो. पूर्वी पोटभर अन्नवस्त्र आणि निवारा एवढीच अपेक्षा असायची. आता अपेक्षा रोज वाढत आहेत. गरजा आणि अपेक्षा यांचा ताळमेळच बसत नसल्यानेसारे काही असूनही निराशेच्या गर्तेत जावे लागते. हे टाळून आनंदात राहायचे असेलतर गरजा व अपेक्षांचा मेळ घालायला हवा.

पशू-पक्षी किती आनंदी असतात पाहा. पोटभर खायला मिळालेकी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा. आपले तसे नाही. कितीही मिळालेतरी अजून अधिक मिळविण्याची आपली हाव असते. जाताना काही घेऊन जायचे नाहीहे माहीत असूनही आणखी मिळविण्याची हाव. यामुळे अमाप संपत्तीसोयी,-सुविधा असूनही गरज आणि अपेक्षा यांत ताळमेळ नसल्यानेअनेक जण सुखाच्या शोधातच फिरतात. समाधान असेलतरच पैसा सुख देतो.

अनेकदा आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाहीयावरच चर्चा अधिक असते. शेजाऱ्यांकडे काय नाहीयापेक्षा काय आहे यावर लक्षत्यामुळे जे आपल्याकडे नाहीत्याचे दु:ख अधिक. अशा विचारांनी मानसिक स्वास्थ्य जाते. स्वत:कडील गोष्टींची किंमत कळत नाही. अपेक्षा करीत वेळ वाया जातो. अशा वेळी इतरांच्या गोष्टी पाहून दु:खी होण्यापेक्षाआपल्याला त्याची गरज आहे काहे पाहायला हवे. तसा प्रश्नच आपल्या मनाला विचारायला हवा. असा प्रश्न विचारलातर अनेकदा त्याची काही गरज नसल्याचे उत्तर आपले मन देईलकारण शेजाऱ्यांनी घर सजवलेम्हणून आपले लगेच सजवायलाच हवे काभावकीत कुणी काही खरेदी केलीतर लगेच आपणही ते घ्यायलाच हवेअसे नाही. त्यांनी केलेम्हणून मी केलेच पाहिजेही भावना कधीच सुखी करणारी नसते.

बऱ्याच वेळा आपण आवश्यकता नसताना अपेक्षा करतो. क्षमता आणि ऐपत नसताना बऱ्याच वस्तूंची खरेदी करतो. समाज काय म्हणेलया भीतीने काही गोष्टी डामडौलाने करून विनाकारण कर्जबाजारी होतो. आपण कुणाशी तरी सतत तुलना करीत राहिलोतर कधीच आनंदी जीवन जगू शकणार नाहीत्यामुळे तुलना करताना आपल्यापेक्षा मोठ्या नव्हेतर छोट्यांबरोबर केल्यास नक्कीच आनंदी व्हाल आणि आनंदी राहाल. हे करताना अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षाअंथरूणच पसरण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.



Friday 8 April 2022

APRIL TIMELINE



#2 APR

   HAPPY GUDI PADWA
   गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

#2 APR
   HAPPY GUDI PADWA
   गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

#2 APR
   HAPPY GUDI PADWA
   गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

#2 APR
   HAPPY GUDI PADWA
   गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

#7 APR 
   World Health Day
   जागतिक आरोग्य दिन 


  

#8 APR
 BIRTH ANNIVERSARY 
  DR.HARVEY CUSHING 
  FATHER OF NEUROSURGERY 
  HAPPY NEUROSURGEONS DAY 
  न्यूरोसर्जन दिनाच्या शुभेच्छा.

#10 APR
HAPPY RAM NAVAMI 
राम नवमीच्या शुभेच्छा

#11 APR 
    Krantisurya Mahatma Jyotiba Phule
   क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले  

#11 APR 
    Krantisurya Mahatma Jyotiba Phule
   क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले  

#10 APR
   BABASAHEB AMBEDKAR
   बाबासाहेब आंबेडकर 

#16 APR 
   HAPPY HANUMAN JAYANTI 
   हनुमान जयंती

#22 APR 
   WORLD EARTH DAY 
    जागतिक पृथ्वी दिवस

#30 APR 
    RASTRASANT TUKDOJI MAHARAJ JAYANTI
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती




















त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...