Tuesday 4 July 2023

सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेला स्टेट बँक ऑफ इंडिया चां हातभार

       गेल्या बारा वर्षापासून अखंड चालू असलेल्या  सिद्धगिरी हॉस्पिटलच्या आरोग्यसेवेच्या तपस्येला आज स्टेट बँक ऑफ इंडिया ने ॲम्बुलन्स प्रदान करून पाठबळ दिले. मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

      कणेरी सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटल हे भारतातील पहिले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देत असताना ॲम्बुलन्स हा घटक खूप महत्त्वाचा ठरत आला आहे. ही सेवा 24 तास उपलब्ध असते. अगदी दुर्गम भागात सुद्धा ही सेवा दिली जाते. ही गोष्ट लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाने सिद्धगिरी मठाला ॲम्बुलन्स प्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा कार्यक्रम आज सिद्धगिरी हॉस्पिटल मध्ये ५ वाजता संपन्न झाला. 

     यावेळी प.पु.अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजीनी तसेच  प्रख्यात निरो सर्जन डॉक्टर शिवशंकर मरजकके यांनी सिद्धगिरी मठाच्या विविध उपक्रमांची तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. तसेच ॲम्बुलन्स प्रदान केल्याबद्दल sbi चे आभार मानले न्यूरोलोजिस्ट डॉ.प्रकाश भरमगौडर यांनी एस.बी.आय. च्या सर्व मान्यवरांशी संवाद साधला. SBIचे महाराष्ट्र जनरल मॅनेजर जोगेंद्र पाल सिंग यांनी सिद्धगिरी हॉस्पिटल सारख्या नो प्रॉफिट नो लॉस या तत्त्वावर काम करणाऱ्या हॉस्पिटलला ॲम्बुलन्स प्रदान करताना आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धगिरी हॉस्पिटलचे एच.आर.श्री विवेक सिद्ध यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला SBI चे महाराष्ट्र जनरल मॅनेजर जोगेंद्र पाल सिंग, डेप्युटी जनरल मॅनेजर (ए.ओ कोल्हापूर) एम.एन.प्रसाद, रिजनल मॅनेजर विवेक कुमार सिन्हा यांच्यासोबत सिद्धगिरी हॉस्पिटल चा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.










No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...