Thursday 10 February 2022

हृदयरोगाचा त्रास होतोय? कशी काळजी घ्याल!

हृदयरोगाचा त्रास होतोय? 
कशी काळजी घ्याल!

हृदयविकाराचे प्रमुख प्रकारः- 

कोरोनरी आर्टरी डिसीज 

कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे. ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक (फॅटी पदार्थ) जमा होतात. यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, छाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात. 

हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी 

हा अनुवांशिक आजार असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणे, श्वास न लागणे आणि पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात. 

- जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. जसे की, हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष), भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणे ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात. 

- कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हृदयापर्यंत पोहोचल्यासही हृदयविकार होऊ शकतो. यामुळे हृदयात जळजळ होणं ही समस्या उद्भवते.


हृदयविकाराची प्रमुख कारणेः-

• हृदयाला रक्तपुरवठा योग्यपद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो

• व्यायामाचा अभाव

• अतिताणतणाव

• धुम्रपान व मदयपानाची सवय

• लठ्ठपणा

• अयोग्य जीवनशैली

• पौष्टिक आहाराचा अभाव


हृदयविकार कशामुळे होतो ?

• उच्च रक्तदाब

जेव्हा रक्तवाहिन्या आणि इतर रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दबाव जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. या उच्च रक्तदाबाचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास हदयासह, मूत्रपिंड, मेंदू आणि शरीराच्या अन्य अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो.

• अनियंत्रित कोलेस्टेरॉलची पातळी

शरीरात चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकार होऊ शकतो. यामुळे रक्तवाहिन्या अरूंद होतात आणि हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि शरीराच्या इतर भागात रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. 

• मधुमेह 

रक्तात साखरेचं प्रमाण अधिक असल्यास मधुमेहाची लागण होते. हा मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास हृदयावर याचा परिणाम होऊ शकतो. 

• लठ्ठपणा

लठ्ठपणा हा अनेक आजारांना निमंत्रण देतो. जसे की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तसेच हृदयरोग देखील होतो.


हदयविकार टाळण्यासाठी खास टिप्सः-

  • धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.
  • सायकलिंग, चालणे, पळणे, पोहणे, अँरोबिक व्यायाम, ट्रेडिमिल आणि नियमित जॉगिंग करा. दररोज शारीरिक व्यायाम केल्याने शरीराला ऑक्सिजन योग्यप्रमाणात मिळण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे पंपिंग योग्यपद्धतीने होते. 
  • लठ्ठपणा टाळा
  • शाकाहारी,  नट्स,  बियाणे खावेत, ज्यामुळे आपल्या हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढेल.

................................................

सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर

हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया विभाग

कणेरी मठ, कणेरी ता. करवीर जि. कोल्हापूर

संपर्क क्रमांक

70701 91008 / 0231-2671774*

................................................

आमच्याशी कनेक्टेड राहा

लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा.

www.facebook.com/siddhagirihospital

https://www.instagram.com/siddhagirihospital

https://www.youtube.com/channel/UCHrvSJzekiROpnkbmtsdddw

https://siddhagirihosiptal.blogspot.com/

.....................................................................

इतर ब्लॉग्ज

.....................................................................

 

No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...