Thursday 10 February 2022

हृदयविकार ओळखायचा कसा?

हृदयविकार ओळखायचा कसा?

सिद्धगिरी हृदयरोग व हृदयशस्त्रक्रिया विभाग

सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका (हार्ट अॅटॅक) आलेला देखील काही वेळा कळत नाही. केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही.

केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इथपासून ते त्याचे प्रकार, उपचार आणि त्याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे.


१) छातीत दुखणं 

सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण.

२) उलटी किंवा मळमळ 

बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. अॅसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.

३) चक्कर येणं 

काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं

४) छाती जड वाटणं

छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं.

५) दम लागणं- श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणं.

६) घाम येणं - काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.

७) कोरडा खोकला - दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणं.

८) अस्वस्थता- चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं.

अशी लक्षणं दिसताच हे करा.

१) शांतपणे पडून राहावं व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवावं.

२) हालचाल करू नये. स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये.

३) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणं.

४) अॅम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणं.

जवळच्या आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाणं जरुरीचं आहे. या नंतरची पूर्ण उपचारपद्धती अद्ययावत सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होईल अशा हॉस्पिटलमध्येच जावं.

पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास व बाहेरून हृदयाला कृत्रिम (कार्डिअॅक मसाज) दाब देणं हे यावेळी गरजेचं असतं. 

पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करणं गरजेचं असतं. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकतं. अन्यथा याबाबत प्रथमोपचाराची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणं आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत.

................................................

सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर

हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया विभाग

कणेरी मठ, कणेरी ता. करवीर जि. कोल्हापूर

संपर्क क्रमांक

70701 91008 / 0231-2671774*

................................................

आमच्याशी कनेक्टेड राहा

लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा.

www.facebook.com/siddhagirihospital

https://www.instagram.com/siddhagirihospital

https://www.youtube.com/channel/UCHrvSJzekiROpnkbmtsdddw


No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...