Tuesday, 19 April 2022

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी !

बदलत्या आणि अनियमित जीवनशैलीमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होत असल्याची अनेकांची तक्रार आहे. चुकीचा आहार आणि कामाचा ताण यामुळे अनेकजण त्यांच्या डोळ्यांची निगा योग्यप्रकारे ठेवताना दिसत नाहीत.

डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची कारणे...

#धूळ आणि धुर...

डोळ्यांना धूळ आणि धुर यांचा सामना आजकाल प्रत्येकालाच करावा लागतो

#उशीरा झोपणे...

रात्री उशीरापर्यंत वाचन करणे, मोबाइलवर पाहत बसणे, टिव्ही बघणे अथवा कॉम्प्यूटरवर जास्त वेळ काम करणे यामुळे देखील डोळ्यांचे विकार वाढण्यास मदत होते.

#कडक उन्हात बाहेर पडणे...

डोळ्यांना इजा होवू नये यासाठी  गॉगल लावून कडक़ उन्हात बाहेर पडा. 

#वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करणे... 

डोळ्यांना सजवण्यासाठी वेग-वेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करत असतात. या उत्पादनांमधील केमिकल्समुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते.

#चुकीचा आहार...

पौष्टिक आहार न घेतल्यास डोळ्यांची दृष्टी अधूक होण्याची शक्यता असते.


डोळ्यांची निगा कशी राखावी याबद्दल -

#पाण्याने  डोळे धुवा...

वेळो-वेळी पाण्याने डोळे धुतल्यास आराम मिळेल. डोळ्यांचे डिहायड्रेशन होणार नाही. 
तसेच डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल. सारखे डोळे धुण्यामुळे डोळ्यांवर 
येणारा ताण कमी होण्यास मदत होते. 

#डोळ्यांना आराम मिळेल असा व्यायाम करा...

दोन्ही हात एकमेकांवर चोळून ते गरम झाल्यावर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

#पूर्ण झोप घ्या...

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. 
कमी झोपेने डोळ्यांची दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. 

#ब्रेक घ्या... 

डोळ्यांवर ताण पडणारे काम करत असल्यास थोडासा ब्रेक घ्या. 
यामुळे डोळ्यांना आराम मिळेल आणि आरोग्य उत्तम राहिल.

#नियमित डोळ्यांची तपासणी करा...

तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास जरी होत नसला तरी वर्षातुन एकदा 
डोळ्याची तपासणी करुन घ्या. या तपसणीमुळे तुमच्या डोळ्यांची योग्य प्रकारे निगा राखली जाईल 
आणि काही निदान झाल्यास त्यावर उपचार करता येतील.

#दूरवरच्या वस्तू पाहण्याची सवय लावा...

आपण साधारण जवळच्या वस्तु सहज बघतो. परंतु लांबच्या वस्तू बघण्याची सवय डोळ्यांना झाली पाहिजे. डोळ्यांची दूर दृष्टी चांगली राहावी यासाठी अधून-मधून लांबच्या वस्तू पाहण्याची सवय करा.

#सनग्लांसेसचा वापर करा...

बाहेर जाण्याआधी डोळ्यांवर सनग्ला स जरूर लावा. याने डोळ्यांवर पडणा-या घातक किरणांपासून बचाव होईल. शक्यतो सनग्लास चांगल्या क्वालिटीचे वापरावे.

#हिरव्या भाज्या...

हिरव्या भाज्या ब्रोकली, पालक, साग, मेथी यांचे सेवन आहारात करावे. 
यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात पालकाचे सेवन करावे. याशिवाय व्हिटॅमिन सी असणारी फळे जसे आवळा, संत्री यांचा समावेश करावा.





No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...