Thursday 23 June 2022

ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे केली यशस्वी




ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे केली यशस्वी 

कणेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या चा सर्वात मोठा प्रभाव असणाऱ्या आजरावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वीरित्या केली आहे.

आठ वर्षांपासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवत आली होती. तसेच यासाठी 10 ते 12 लाख इतका खर्च सांगण्यात आला होता.अशा परिस्थितीत दुर्मिळ आणि अत्यंत अवघड अशा शस्त्रक्रियेचे आव्हान हॉस्पिटलचे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ.शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमने स्वीकारून ते यशस्वी करून दाखवले.ब्रेन बायपास सर्जरी ही जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे केली यशस्वी 

या संदर्भातील पत्रकार परिषद कोल्हापूर प्रेस क्लब येथे आज दिनांक १५ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.

"दरम्यान मेंदूतील हा फुगवटा सामान्यता ६ ते ७ मी.मी एवढा असतो.आणि यामध्ये पेशंटच्या दगावण्याची शक्यता ५०% असते. पण या केसमध्ये हा फुगवटा 10.5 से.मी एवढा मोठा होता. रुग्णाच्या मेंदूपासून अक्कल दाढेपर्यंत त्याची व्याप्ती वाढली होती.त्यामुळे त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त प्रवाह सुरू झाला होता.यावेळी हाताच्या शिरेचा तुकडा वापरून, बायपास पद्धतीने गळ्याच्या त्वचे खालून मेंदूपर्यंत शिर जोडून, मेंदूला जाणारा रक्तपुरवठा सुरू ठेवण्यात आला.आणि त्यानंतर फुगवटा असणारी शिर दोन्ही टोकाकडून बंद करण्यात आली.आणि तब्बल अकरा तास अखंडपणे शस्त्रक्रिया करून डॉ.शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या टीमने सदर रुग्णाचा जीव वाचल्याची आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. तर या शस्त्रक्रियेमध्ये "न्यूरो भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगोंडा,हार्ट सर्जन डॉक्टर अमोल भोजे, यांनी मोलाचे योगदान दिले.

शक्यतो मेट्रो सिटी मध्ये असणाऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अशा शस्त्रक्रिया होतात. भारतात अशा हॉस्पिटलची संख्या ७ ते ८ आहे पण कनेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटल ते भारतातील एकमेव ग्रामीण भागात असणारे हॉस्पिटल आहे.

सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी येथे असणारी अत्युच्च ऑपरेशन मशीनरी ज्यांची किंमत ५ ते ६ करोड इतकी आहे.मेंदुवरील सर्व शस्त्रक्रिया,भूलतज्ज्ञ स्पेशालिस्ट, न्यूरो सर्जरी साठी प्रशिक्षित स्टाफ या वैशिष्ट्यांमुळे सुमारे ४०० ते ५०० किलोमीटर वरील पेशंट अशा शस्त्रक्रियेसाठी सिद्धगिरी हॉस्पिटलला प्राधान्य देतात असे डॉक्टर शिवशंकर आजच्या आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

डॉक्टर शिवशंकर मरजक्के हे डबल गोल्ड मेडलिस्ट असून १२ हजार पेक्षाही जास्त शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केले आहेत. मेंदूच्या फुगवट्याच्या शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

भारतामध्ये या प्रकारच्या तसेच अपस्मार इंडॉस्कॉपी शस्त्रक्रिया करणारे केवळ १५ ते २० सेंटर्स आहेत.परंतु सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ येथे फक्त मेंदूच नाही तर हार्ट,कॅन्सर,किडनी प्लास्टिक सर्जरी, स्त्रीरोग यावर देखील सिद्धगिरी हॉस्पिटल येथे माफक दरात शस्त्रक्रिया आणि उपचार केले जातात. सिद्धगिरी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा आय सी यू केअर सेंटर असून आयुर्वेदिक उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

तर श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ संचलित सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर 12 वर्षांपासून विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया सर्वसामान्यांसाठी एक आरोग्यसेवा म्हणून अगदी माफक दरामध्ये करत आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या 17 एकर परिसरामध्ये आणि स्वामीजींच्या अध्यात्मिक सहवासात सिद्धगिरी हॉस्पिटल च्या यशाचा आलेख इतर कोणत्याही हॉस्पिटलच्या तुलनेत उजवा ठरत आहे. तर याचा लाभ लोकांनी घ्यावा असे आवाहन "परम पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी आणि हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर प्रख्यात neuro surgeon डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी केले आहे.

दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी मठाचे परमपूज्य "श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी" प्रख्यात nuro surgeon डॉक्टर शिवशंकर मरजक्के, डॉक्टर प्रकाश भरमगोंडर,डॉ. अमोल भोजे यांच्यासह इतर उपस्थित होते.



आमच्या सोशल मिडिया चॅनेल्सना लाईक करा व राहा कनेक्टेड

https://www.facebook.com/siddhagirihospital


www.youtube.com/Siddhagiri hospital


No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...