Thursday, 24 March 2022

 #'कोरोना' काळातील सामाजिक बांधिलकीचा 'कणेरी पॅटर्न'


 #कणेरीमठ कोविड सेंटरमध्ये उपचार माफक दरात 


Monday, 14 March 2022

चांगली जीवनशैलीच तणावमुक्त जीवन देवू शकते - डॉ. शिवशंकर मरजक्के

मेंदूत रक्तस्त्रावाच्या घटनांत वाढ


मेंदूत रक्तस्त्राव झालेला रुग्ण पंधरवड्यात एखादा-दुसरा येत असे. अलिकडे आठवड्यात दोन रुग्ण दाखल होत आहेत. चांगली जीवनशैलीच तणावमुक्त जीवन देवू शकते. त्यासाठी सकस आहार घ्या. नियमित व्यायाम करा. गरज नसताना खाऊ नका. कोणत्याही कारणाने तणाव घेवू नका व इतरांना देवू नका. रक्तदाबाच्या नेहमीच्या गोळ्या चूकवू नका. मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या रुग्णाला वेळेत योग्य डॉक्टरांपर्यंत पोहोचवा. जीवनशैलीत बदल करून मेंदूतील रक्तस्त्राव व उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो. आपले आरोग्य आपल्याच हाती आहे, हे लक्षात ठेवा.

डॉ. शिवशंकर मरजक्के

मेंदू शल्यचिकित्सक, सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी मठ

........................................................................

बदललेले खाद्य पदार्थ, जीवन पद्धती, पैशासाठी सुरु असलेले अतिश्रम व कामाच्या ठिकाणचे मानसिक त्रास यामुळे शरीरावर ताण वाढत आहे. यातून अतिरक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. परिणामी अतिरक्तदाबामुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याच्या घटनातही वाढ होत असल्याचे चित्र आहे.

पूर्वी लोक कामावरून आले तरी तणाव फारसा नव्हता. काळ बदलला आणि जगण्याची पद्धत बदलून गेली. पैशासाठी दोन-दोन ठिकाणची कामे करून जगण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा मिळवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरु झाले. खानपानाच्या सवयी बदलल्या. माणसाकडे पैसा आल्यामुळे हॉटेलमध्ये जाणे, जेवणाची पार्सल मागविण्याकडे कल वाढला. यातून शरिराच्या पोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी चमचमीत पदार्थ आणि फास्टफूडवर भर दिला जात आहे. ग्रामीण भागातही हॉटेलिंगचे प्रमाण वाढले. 

त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याची धावपळ असते. साईड बिझनेस सुरु केले आहेत. शरिराला आवश्यक नसताना तेलकट, तिखट पदार्थ जाऊ लागले. वेळी-अवेळी पोट भरणे सुरु झाले. याचा परिणाम शरीरावर होवू लागला असून वयाच्या ३० ते ४० वर्षातच रक्तदाबाचे, मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत. अतिरक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याच्या घटनांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. अॅन्यरिझम प्रकारामध्ये रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव होतो. त्यामुळे झालेल्या रक्तस्त्रावामुळे ५० टक्के पेशंट जागेवरच मयत होतात. २५ टक्के पेशंट कोमात जातात. उर्वरित २५ टक्के रुग्णांची प्रकृती स्थिर राहते. ही टक्केवारी अॅन्युरिझमशी संबंधित आहे. उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावाशी नाही. रक्तस्त्रावाचे प्रमाणे थंडीच्या दिवसात जास्त असते. वेळेत डॉक्टरांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. योग्य ठिकाणी योग्य वेळेत पेशंट पोचविल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता जास्त असते.

.......

नेमके काय होते ?

मेंदूतील रक्तस्त्राव या आजारात रक्तवाहिन्या कडक झालेल्या असतात. जादा रक्तदाबाने त्या फुटतात. छोट्या रक्तवाहिन्या फुटल्या तर थोडे नुकसान होते व ते भरुन येते. मोठ्या रक्तवाहिन्या फुटल्या तर मेंदूचे खूप नुकसान होते. ५० ते ६० वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण जास्त आढळून येते आहे. मेंदूत रक्तस्त्राव होणे ही एक कॉमन गोष्ट होत आहे. अतिताणामुळे मेंदूत रक्तस्त्राव होतो आणि आतील भागात गंभीर दुखापत होऊन अपंगत्व येते.











In News I Sakal Kolhapur Today Page 3 I 12 March 2022



Tuesday, 8 March 2022

दातांचे आरोग्य आणि काळजी

दातांचे आरोग्य आणि काळजी

तोंडाचे आरोग्य हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.  तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात.  दातांची, हिरड्यांची नियमित स्वच्छता, तपासणी हा सर्वात महत्वाचा भाग आहे.

_______________________________

कोणताही पदार्थ खाल्यास प्रत्येकवेळी तोंड धुणे आवश्यक 

आपण दिवसभर विविध पदार्थ खात असतो. परंतु प्रत्येकवेळी तोंड स्वच्छ करतोच असे नाही. त्यामुळे अन्नकण दातांच्या फटीमध्ये अडकून राहीलेले असतात. ज्यामुळे हिरड्यांचे विकार जडू शकतात.  योग्य पद्धतीने ब्रश करायला शिका, हिरड्यांना बोटाने हात फिरवून स्वच्छ करा. 

_______________________________

तोंडाच्या दुर्गंधीचे कारण काय?

दात स्वच्छ न केल्यामुळे दातावर टारटर जमतो. हा थर काढल्यास दात स्वच्छ होतात. वेळीच उपचार न केल्यास रक्त व पू येतो. काही वेळा रक्तक्षयामुळे हिरड्यांमधील घाण साफ करावा.

_______________________________ 

मुलांच्या दातांची काळजी 

दिवसातून दोन वेळा ब्रश करावा.

दूध पिण्यासाठी प्रवृत्त करावे. 

बाजरी, नाचणी, शेवगा, सीताफळ, रामफळ यांचा आहारात समावेश करावा.

_______________________________


खालील गोष्टी दाताने करू नका.

दातांनी बाटलीचे झाकण किंवा कडक वस्तू तोडू नये, दुखापत होते.

दात हालत असताना दोऱ्याने किंवा हाताने काढू नये त्यामुळे हिरड्या दुखतात.

दात कोरु नयेत, असे केल्याने दातांना व हिरड्यांना इजा पोहोचते.

दुधाचे दात पडून गेल्यावर नवीन येणाऱ्या दातांची काळजी घ्यावी.

_______________________________

Saturday, 12 February 2022

अॅन्युरिझम शस्त्रक्रिया यशोगाथा - सिद्धगिरी हॉस्पिटल, कणेरी मठ

अॅन्युरिझम
या मेंदू विकारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्यंत कुशल तज्ज्ञांची टीम आणि अद्ययावत यंत्रणा लागते. या विकाराचे निदान व यशस्वी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे झाले.त्याची ही यशोगाथा...














Thursday, 10 February 2022

हृदयरोगाचा त्रास होतोय? कशी काळजी घ्याल!

हृदयरोगाचा त्रास होतोय? 
कशी काळजी घ्याल!

हृदयविकाराचे प्रमुख प्रकारः- 

कोरोनरी आर्टरी डिसीज 

कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे. ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणाऱ्या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक (फॅटी पदार्थ) जमा होतात. यामुळे हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, छाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात. 

हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी 

हा अनुवांशिक आजार असून हृदयाच्या स्नायूंशी संबंधित आहे. या आजारात थकवा, चक्कर येणं, छातीत दुखणे, श्वास न लागणे आणि पाय सुजणे ही लक्षणे दिसून येतात. 

- जन्मजात लहान मुलांमध्येही हृदयाशी संबंधित विकार दिसून येतात. जसे की, हार्ट वाल्व्ह आणि वॉल दोष), भूक न लागणे, वजन न वाढणे, अंग निळसर दिसणं, श्वास घेताना अडचण जाणवणे ही नवजात मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणं दिसून येतात. 

- कुठल्याही प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग हृदयापर्यंत पोहोचल्यासही हृदयविकार होऊ शकतो. यामुळे हृदयात जळजळ होणं ही समस्या उद्भवते.


हृदयविकाराची प्रमुख कारणेः-

• हृदयाला रक्तपुरवठा योग्यपद्धतीने न झाल्यास हा आजार होऊ शकतो

• व्यायामाचा अभाव

• अतिताणतणाव

• धुम्रपान व मदयपानाची सवय

• लठ्ठपणा

• अयोग्य जीवनशैली

• पौष्टिक आहाराचा अभाव


हृदयविकार कशामुळे होतो ?

• उच्च रक्तदाब

जेव्हा रक्तवाहिन्या आणि इतर रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा दबाव जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो. या उच्च रक्तदाबाचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास हदयासह, मूत्रपिंड, मेंदू आणि शरीराच्या अन्य अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो.

• अनियंत्रित कोलेस्टेरॉलची पातळी

शरीरात चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकार होऊ शकतो. यामुळे रक्तवाहिन्या अरूंद होतात आणि हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि शरीराच्या इतर भागात रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. 

• मधुमेह 

रक्तात साखरेचं प्रमाण अधिक असल्यास मधुमेहाची लागण होते. हा मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास हृदयावर याचा परिणाम होऊ शकतो. 

• लठ्ठपणा

लठ्ठपणा हा अनेक आजारांना निमंत्रण देतो. जसे की, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तसेच हृदयरोग देखील होतो.


हदयविकार टाळण्यासाठी खास टिप्सः-

  • धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.
  • सायकलिंग, चालणे, पळणे, पोहणे, अँरोबिक व्यायाम, ट्रेडिमिल आणि नियमित जॉगिंग करा. दररोज शारीरिक व्यायाम केल्याने शरीराला ऑक्सिजन योग्यप्रमाणात मिळण्यास मदत होते. याशिवाय हृदयाचे पंपिंग योग्यपद्धतीने होते. 
  • लठ्ठपणा टाळा
  • शाकाहारी,  नट्स,  बियाणे खावेत, ज्यामुळे आपल्या हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढेल.

................................................

सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर

हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया विभाग

कणेरी मठ, कणेरी ता. करवीर जि. कोल्हापूर

संपर्क क्रमांक

70701 91008 / 0231-2671774*

................................................

आमच्याशी कनेक्टेड राहा

लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा.

www.facebook.com/siddhagirihospital

https://www.instagram.com/siddhagirihospital

https://www.youtube.com/channel/UCHrvSJzekiROpnkbmtsdddw

https://siddhagirihosiptal.blogspot.com/

.....................................................................

इतर ब्लॉग्ज

.....................................................................

 

हृदयविकार ओळखायचा कसा?

हृदयविकार ओळखायचा कसा?

सिद्धगिरी हृदयरोग व हृदयशस्त्रक्रिया विभाग

सध्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं अनेकांना कठीण होत आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे. परंतु, अशाच दुर्लक्षामुळे हृदयविकाराचा झटका (हार्ट अॅटॅक) आलेला देखील काही वेळा कळत नाही. केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही.

केवळ छातीत दुखणं म्हणजे हार्ट अटॅक असू शकतो हे कुणाला खरं वाटत नाही. हृदयविकार नेमका कसा ओळखायचा इथपासून ते त्याचे प्रकार, उपचार आणि त्याची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे.


१) छातीत दुखणं 

सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारचं दुखणं, व्यायामाचे प्रकार केल्यानंतर येणं उदा. चालणं, जिने चढणं, सायकल, आंघोळ, जेवण.

२) उलटी किंवा मळमळ 

बऱ्याचवेळा आपण पित्ताचा त्रास म्हणतो, पण तो हृदयापासून असू शकतो. अॅसिडीटी म्हणून दुखण्याकडे किंवा मळमळीकडे दुर्लक्ष करू शकतो.

३) चक्कर येणं 

काही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येणं

४) छाती जड वाटणं

छातीवर दाब येणं, छाती आवळल्यासारखी वाटणं, वेदना जबड्यावर किंवा मानेवर आणि डाव्या हातावर जाणं.

५) दम लागणं- श्वास घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावा लागणं.

६) घाम येणं - काहीही श्रमाचं काम न करता, अचानक घाम येणं.

७) कोरडा खोकला - दुसऱ्या कोणत्याही कारणाशिवाय खोकला येत राहणं.

८) अस्वस्थता- चेहरा फिका पडणं, कसंतरी वाटणं, खूप भीती वाटणं.

अशी लक्षणं दिसताच हे करा.

१) शांतपणे पडून राहावं व मदतीसाठी तातडीनं कुणाला तरी बोलवावं.

२) हालचाल करू नये. स्वतः चालत जाण्याचा प्रयत्न करू नये. जिने चढणं आणि उतरणं करू नये. स्वतः गाडी चालवू नये.

३) अॅस्पिरीन किंवा सॉरबिट्रेट या दोन्ही गोळ्या जवळ असतील तर त्या घेणं. सॉरबिट्रेट जिभेखाली ठेवणं.

४) अॅम्ब्युलन्सला ताबडतोब बोलवणं.

जवळच्या आधुनिक अद्ययावत सेवा उपलब्ध असलेल्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर जाणं जरुरीचं आहे. या नंतरची पूर्ण उपचारपद्धती अद्ययावत सोयी असलेल्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली होईल अशा हॉस्पिटलमध्येच जावं.

पेशंट बेशुद्ध किंवा अत्यवस्थ झाल्यास, सीपीआर (कार्डिओपल्मनरी रेसिस्टिटेशन) यामध्ये ज्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे त्यांनी पेशंटला कृत्रिम श्वासोच्छवास व बाहेरून हृदयाला कृत्रिम (कार्डिअॅक मसाज) दाब देणं हे यावेळी गरजेचं असतं. 

पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत हे उपाय करणं गरजेचं असतं. त्यामुळे पेशंटला जीवदान मिळू शकतं. अन्यथा याबाबत प्रथमोपचाराची माहिती नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याची उदाहरणं आजकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत.

................................................

सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर

हृदयरोग व हृदय शस्त्रक्रिया विभाग

कणेरी मठ, कणेरी ता. करवीर जि. कोल्हापूर

संपर्क क्रमांक

70701 91008 / 0231-2671774*

................................................

आमच्याशी कनेक्टेड राहा

लाईक करा, सबस्काईब करा, शेअर करा.

www.facebook.com/siddhagirihospital

https://www.instagram.com/siddhagirihospital

https://www.youtube.com/channel/UCHrvSJzekiROpnkbmtsdddw


त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...